रत्नागिरी रेल्वेस्थानकात तिकीट विक्रीच्या खिडक्या वाढवाव्यात, प्रवाशांच्या मागणीचे निवेदन

0

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वेस्थानकावर तिकीट विक्रीसाठी दोन खिडक्या सुरु कराव्यात. हंगामाच्या वेळी तीन तिकीट खिडक्यांवरुन तिकीटविक्री चालू करावी. अशा मागणीचे निवेदन नाचणे ग्रा.पं. चे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य संतोष सावंत यांनी आज कोकण रेल्वेचे क्षेत्रिय प्रबंधक उपेंद्र शेंडये यांना दिले. रत्नागिरी रेल्वेस्थानकाच्या बाहेरील परिसरातील व्हिआयपी फलक काढून टाकावा आणि तो परिसर सर्वसामान्यांसाठी खुला करावा, ज्यावेळी महत्वाच्या व्यक्ती येणार असतील अशावेळी त्या परिसरात सुरक्षा रक्षक तैनात ठेवावा, दादर पॅसेंजर ही गाडी पुर्वीप्रमाणे रत्नागिरीतूनच सुरु ठेवावी, अशा मागण्यांचा निवेदनामध्ये समावेश होता. यावेळी ग्रा.पं. सदस्य संदीप सुर्वे, विवेकं चाळके, संतोष लाखण, श्रीकांत बने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here