मिरजोळे येथील दारु निर्मिती हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

0

रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे येथे गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी सकाळी धाड टाकून उदध्वस्त केली. या कारवाईत ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मात्र, या कारवाईत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हातभट्टी निर्मुलन मोहिमेअंतर्गत आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त वाय. एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मिरजोळे येथील दारुच्या हातभट्टीवर धाड टाकण्यात आली. याठिकाणी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व इतर मुद्देमाल असा एकूण ५७,७०० रुपयांचा मुद्देमला हस्तगत करण्यात आला. तसेच दारु निर्मितीसाठी लागणारे जवळपास २६०० लीटर रसायनही आढळले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रत्नागिरी शहर व ग्रामीण कार्यालयाने संयुक्तपणे केली. या कारवाईत निरीक्षक व्ही. एस. मोरे, पी. एल. पालकर, दुय्यम निरीक्षक ए. ए. पाडाळकर, एस. ए. भगत, सहाय्यक दुय्यम निरीक्षक व्ही. पी. हातिसकर, जवान व्ही, आर. सोनावले, एम. एस. पवार, ओंकार कांबळे, महिला जवान ए. एन. नागरगोजे यांचा समावेश होता.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:18 PM 02-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here