लांजा येथे एसटी बस व मोटारसायकलमध्ये अपघात

0

एसटी बस आणि मोटारसायकल यांच्यामध्ये झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार अरुण महीपत साळुंकेंच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीहून कोल्हापूरला हलवण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास लांजा तालुक्यातील सालपे ब्राह्मणवाडी येथे झाला. लांजा आगाराची कोचरी लांजा ही एसटी बस ही लांजाकडे येत असताना, सालपे ब्राम्हणवाडी येथे समोरून येणारी मोटारसायकल ही एसटी बस चालकाच्या बाजूला पुढच्या चाकाच्या गार्ड वर जाऊन आदळली.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here