“कोरोनात जन्मलेला सोनू सूद नावाचा मसीहा कुठेय?; कोकणच्या पूरपरिस्थितीत महात्मा गायब आहेत”

0

मुंबई : गेल्या काही दिवसांआधी झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका राज्याला बसला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्राचं पावसामुळे मोठं नुकसान झालं. तसेच स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणवार जीवित आणि वित्तहानी देखील झाली. याचपार्श्वभूमीवर सरकारसह राज्यातील विविध राजकीय पक्ष, संस्था कोकणवासियांच्या मदतील धावून जात आहे. अशात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कुठे आहे, असा प्रश्न मनसेने विचारला आहे.

लॉकडाऊनमध्ये सोनू सूदनं परराज्यांतील मजूर, कामगार, कुटूंब यांना आपापल्या घरी पोहोचवण्यास मदत केली होती. अन्नधान्य वाटपही केले होते. कुणी जर सोशल मीडियाच्या माध्यमातून साद घातली तर सोनू सूद मदतीसाठी सदैव तत्पर असायचा. राज्यात भयाण पूरस्थिती होऊनही सोनू सूदनं एकदाही मदतीचा हात स्वतःहून पुढे का केला नाही, असा सवाल मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

शालिनी ठाकरे ट्विट करत म्हणाल्या की, कोरोना काळात सोनू सूद नावाच्या एका महान ‘मसीहा’चा जन्म झाला होता, पण कोकणच्या पूरपरिस्थितीत मात्र हे महात्मे गायब आहेत. मुंबईत राहून, इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का..?, असा सवाल शालिनी ठाकरे यांनी विचारला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:47 PM 03-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here