ते राम मंदिर बांधतील आणि आपण बाबरी मशीद बांधू – फरहान आझमी

0

समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीनं मोठं विधान केलं आहे. फरहान यांनी या वक्तव्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य केलं. उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असतील तर मीही त्यांच्यासोबत अयोध्येला जाईन,आणि त्या ठिकाणी मशीद बांधणार, असं फरहान आझमी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे एक नवा वाद होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येला जाणार आहेत. मी सुद्धा त्यांच्यासोबत जाईन. ते राम मंदिर बांधतील आणि आपण बाबरी मशीद बांधू, असं वक्तव्य फरहान आझमी यांनी केलं. मुख्यमंत्री हे महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. अशी घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. येत्या 7 मार्चला उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जातील. या दौऱ्याची घोषणा करताच भाजपनं टीका केली होती. तर आता फरहान आझमी यांनीही आपण अयोध्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली आहे. मी इशारा देतो, याला धमकी समजा किंवा काहीही समजा, पण मला विनम्रपणे सांगायचं आहे की, जर उद्धव ठाकरेजी जर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून म्हणत असतील की 7 मार्चला आपण अयोध्येला जाणार, तर मी सुद्धा त्यांच्यासोबत जाणार. मी जाणारच, शिवाय माझ्या वडिलांनाही सोबत येण्याची विनंती करणार, सपाच्या आमदारांनाही घेऊन जाणार. शिवाय महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना निमंत्रण देऊ इच्छितो की जर उद्धव ठाकरेजींनी अयोध्येचं तिकीट काढलं, तर आम्ही इकडून पायी अयोध्येसाठी जाऊ. आम्ही सर्वजण सोबत जाऊ. मात्र एक अट असेल, ते राम मंदिराची निर्मिती करतील, आम्ही बाबरी मशीद बांधू, असं फरहान आझमी म्हणाले आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्ही निराश झालो असल्याचंही ते म्हणाले. ते राम मंदिर बांधतील आणि आपण बाबरी मशीद बांधू – फरहान आझमीपुढे फरहान आझमी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाण्याचा निर्णय मुस्लिमांना घाबरवण्यासाठी घेतला आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, जगभरात २०५ अब्ज लोकसंख्या आहे. त्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त मुस्लिम देश आहेत जे आम्हाला हसत-खेळत आमच्या देशात आम्हाला परत घेऊन जातील. पण आम्ही जाणार नाही.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here