‘मोदीजी, तुमच्या राज्यात महागाईमुळे खासदारांनाही चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय’

0

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी महिलांसोबत नृत्यावर ठेका धरताना तर कधी शेतात नांगर धरताना खासदार राणा यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चालतात. असाच एक व्हिडीओ दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, या व्हिडीओवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय आहे व्हिडीओ?
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या व्हिडीओमध्ये चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहेत. यामध्ये त्या चपात्या लाटून चुलीवरील भाजत आहेत. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यातच आता राष्ट्रावादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.

रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?
गॅस महाग झाल्यामुळे खासदार नवनीत राणा यांना गॅसऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. मोदीजी तुमच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅसऐवजी चूल वापरायला लागले आहेत. व्वा! मोदीजी व्वा!. अशी टीका चाकणकर यांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
03:54 PM 03/Aug/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here