जमिनीच्या वादात अडकल्याने 11 वर्ष पद्मश्री पुरस्कार मिळायला उशीर : सुरेश वाडकर

0

नाशिक : नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातील वादग्रस्त जमीन खरेदी केल्यामुळे अडचणीत सापडलेल्या सुरेश वाडकर यांना नाशिक पोलिसांनी दिलासा दिला आहे. जमिनीच्या वादात अडकल्याने 11 वर्ष पद्मश्री पुरस्कार मिळायला उशीर झाला. दरम्यानच्या काळात सरकारी अधिकारी, मोठमोठे राजकीय नेते कोणीच मदत केली नाही, अधिकारी तर केवळ वेळकाढू पण करत असल्याची खंत सुरेश वाडकर यांनी व्यक्त केली.

भूमाफिया विरोधात नाशिक पोलिसांनी मोहिम उघडली असून जनजागृती भूमाफिया या लघुपटाची निर्मिती केली. त्याचा लोकार्पण सोहळा सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर यांच्यां उपस्थितीत पार पडला. यावेळी भूमाफियाचा मी स्वतः शिकार झालो होतो. लॅटिकेशनची जमीन मला विकण्यात आली. माझ्या एका मित्रानेच मला फसवले, वादग्रस्त जमिन खरेदी केल्या प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्याची किंमत मोजावी लागली, असे वाडकर म्हणाले.

वाडकर म्हणाले, राष्ट्पती भवनातून चौकशी झाली. गुन्हा दाखल असल्यानं तब्बल 11 वर्ष पद्मश्री पुरस्काराला मुकावे लागले. याकाळात आम्ही तुमचे मोठे फॅन आहोत असे म्हणणाऱ्या राजकीय नेत्यांनी देखील दिलासा दिला नाही. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, विनोद तावडे यांच्यासह मोठमोठ्या नेत्याकडे गेलो मात्र कोणी दिलासा दिला नाही. अधिकाऱ्यांनी तर फक्त वेळकाढूपणा केल्याचा आरोप वाडकर यांनी पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केला. नाशिकमध्ये संगीत शाळा सुरू करणार असल्याचे देखील वाडकर या वेळी म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:32 PM 03-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here