आरएचपी, फ्रेंड सर्कलतर्फे दिव्यांग पूरग्रस्तांना मदत

0

रत्नागिरी : रत्नागिरीतील नगरसेवक सोहेल मुकादम आणि त्यांच्या शिवखोल-राजिवडा फ्रेंड सर्कलमार्फत रत्नागिरी हॅंडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन (आरएचपी) फाउंडेशनच्या सहकार्याने चिपळूणमधील पूरग्रस्त दिव्यांगांना मदत देण्यात आली. चिपळूणमधील आदर्श निवास सोसायटीत दिव्यांग मुजावर आणि चिपळूण पालिका कार्यालयात दिव्यांग कर्मचारी राज शिर्के यांच्या सहकार्याने या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये चादरी, बेडशीट, टॉवेल आणि जीवनावश्यक वस्तू यांचा समावेश होता. सोहेल मुकादम यांनी खेर्डीतील ग्रामस्थांना गरजेनुसार लागणाऱ्या वस्तूंचेही वाटप केले. दिव्यांग बांधवांची गरज ओळखून ही मदत करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:46 PM 03-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here