टोकियो ऑलिम्पिक: कुस्ती: रवि दहिया, दीपक पुनियाची शानदार कामगिरी, अंशु मलिकचा पराभव

0

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं आज आशादायक सुरुवात केली आहे. भालाफेकमध्ये नीरज चोप्रा फायनलमध्ये गेल्यानंतर कुस्तीत देखील भारताच्या कुस्तीपटूंनी शानदार यश मिळवलं आहे. भारताचे कुस्तीपटू रवि दहिया, दीपक पुनियानं आपापल्या गटात शानदार एकतर्फी विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताची कुस्तीपटू अंशू मलिकला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रवि दहिया विरुद्ध कोलंबियाच्या ऑस्कर टिगरेरोस उरबानो यांच्यातील पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविनं शानदार विजय मिळवला. रवि दहियानं हा सामना जिंकत प्री क्वार्टर फायनल सामन्यात बाजी मारली आहे. रविनं हा सामना एकतर्फी जिंकला. त्यानं कोलंबियाच्या कुस्तीपटूला 13-2 असा पराभव केला. रविकुमारनं या गटात सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. क्वार्टर फायललमध्ये त्यानं बलगेरियाच्या कुस्तीपटूला 14-4 असं पराभूत करत पुढची फेरी गाठली. सेमिफायनलमध्ये तो पाकिस्तानच्या खेळाडूशी लढणार आहे.

तर पुरुष फ्रीस्टाइल 86 किलो गटात प्री क्वार्टर सामन्यात दीपक पुनियानं नायजेरियाच्या एकरेकेम एगियोमोरला 13-1 असं हरवत क्वार्टर फायनलमध्ये जागा मिळवली आहे. तर महिला फ्रीस्टाइल 57 किलोगटात अंशु मलिकला बेलारुसच्या इरिना कुराचिकिनाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या कुस्तीपटूशी झालेल्या सामन्यात दीपकनं रोमांचक विजय मिळवला. त्यानं चीनच्या खेळाडूचा 6-3 असा पराभव केला. शेवटच्या दहा सेकंदात 3-3 अशी बरोबरी असताना दीपकनं तीन प्वाईंट घेत 6-3 अशी आघाडी घेत शानदार विजय मिळवला. तर महिला फ्रीस्टाइल 57 किलोगटात अंशु मलिकला बेलारुसच्या इरिना कुराचिकिनाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.

नीरज चोप्राची जेलवीन थ्रो म्हणजेच भालाफेक स्पर्धेत शानदार कामगिरी

ऑलिम्पिकमधील आजच्या दिवसाची सुरुवात भारतासाठी सकारात्मक ठरली. भारतासाठी स्टार अॅथलीट नीरज चोप्रानं जेलवीन थ्रो म्हणजेच भालाफेक स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. नीरजनं भालाफेकमध्ये अंतिम सामन्यात जागा बनवली आहे. नीरज चोप्रासमोर फायनल्स गाठण्यासाठी 83.5 मीटरचं टार्गेट होतं. परंतु, नीरजनं 86.65 चा थ्रो करत फायनल्समध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. नीरज चोप्राकडून पदकाची अपेक्षा केली जात असून त्यानं क्वालिफाईंग राऊंडमध्येच आपलं लक्ष्य स्पष्ट केलं आहे. क्वालिफाइंग राउंडच्या ग्रुप ए मध्ये नीरज चोप्रा टॉपवर आहे.

त्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:24 AM 04-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here