लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीची फसवणूक; ‘पोक्सो’अंतर्गत आरोपीस १० वर्षे कैद

0

रत्नागिरी : तीन वर्षांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून पळवून नेत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी आरोपीला ‘पोक्सो’ न्यायालयाने मंगळवारी १० वर्षे साधी कैद आणि १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सतिश बाळा इखे (२४, रा. घोडेगाव नेवासे, अहमदनगर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडित मुलीच्या वडिलांनी त्याच दिवशी म्हणजे १५ जून २०१८ रोजी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी पीडितेसह तरुणाचा सर्व जिल्ह्यात शोध घेतला. मात्र, ती आढळली नाही. अखेर तब्बल ६ महिन्यांनी म्हणजेच १३ डिसेंबर २०१८ रोजी संगमेश्वर पोलिसांनी दोघांनाही औरंगाबादहून ताब्यात घेऊन संगमेश्वरला आणले. या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी सतीश विरोधात भा. दं. वि. कलम ३६३,३७६ (२) पोक्सो कायद्यांतर्गत ५ व ६ चे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:21 PM 04-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here