सागरी सीमा मंच, जिल्हा भजन प्रासादिक मंडळाच्या गुरुपुष्पांजली स्पर्धेचा निकाल जाहीर

0

रत्नागिरी : सागरी सीमा मंच, कोकण प्रांत आयोजित आभार संस्था संचालित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळाच्या सहयोगाने कोकण विभागीय ऑनलाइन गुरुपुष्पांजली स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून याचे प्रथमच आयोजन केले होते. सुरक्षित किनारपट्टी, समर्थ भारत या सागरी सीमा मंचाच्या ब्रीदवाक्यानुसार सागरी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बक्षीस वितरणाला सागरी सीमा मंचचे द. रत्नागिरी जिल्हा संयोजक स्वप्नील सावंत, मंडळ अध्यक्ष साईनाथ नागवेकर, दादा वाडेकर, बुवा प्रवीण सावंतदेसाई, संजय मेस्त्री, एकनाथ पंडये, राकेश बेर्डे, प्रसाद राणे, वासुदेव वाघे उपस्थित होते. पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने मच्छीमार बांधवांना व्यासपीठ मिळण्यासाठी किनारपट्टीवरील भजनी कलाकारांना सर्वांबरोबर सहभाग घेता यावा, म्हणून स्पर्धेचे पालकत्व सागरी सीमा मंचने स्वीकारले. यापुढेही असे अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत, असे प्रतिपादन स्वप्नील सावंत यांनी केले. साईनाथ नागवेकर, प्रांत संयोजक संतोष पावरी यांच्या मार्गदर्शनाखाली बुवा लक्ष्मीकांत हरयाण, धनंजय मोसमकर, अनिकेत कोंडाजी, प्रसाद राणे, संजय सुर्वे, नीलेश मेस्त्री, विनायक डोंगरे, राकेश बेर्डे व सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली. स्पर्धेचा गुणानुक्रमे सविस्तर निकाल असा – लिंगेश्वर प्रसादिक भजन मंडळ विक्रोळी, बुवा राजाराम परब, विश्वकर्मा प्रसादिक भजन मंडळ, आगरनरळ, बुवा मारुती मेस्त्री, श्रीगांगो माऊली प्रासादिक भजन मंडळ, खार, बुवा संतोष लाड, श्री गावदेवी प्रसादिक भजन मंडळ (बदलापूर) बुवा, अक्षय जमदरे, लक्ष्मी म्हंकाळी प्रासादिक भजन मंडळ, लांजा, बुवा भैरवी जाधव, हनुमान प्रासादिक भजन मंडळ, दापोली, बुवा अनिकेत वालावलकर, श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळ कोपरखळे, बुवा ज्ञानेश्वर म्हात्रे, लिंगेश्वर प्रसादिक भजन मंडळ, कल्याण, बुवा सागर तेरसे.
सर्वोत्कृष्ट लाइक (पुरुष गट) ब्रह्मदेव प्रासादिक भजन मंडळ उपळे, राजापूर, बुवा केदार कदम, नवोदित कलाकार- एकवीरा आई प्रासादिक भजन मंडळ, कर्जत, बुवा गणेश चौधरी, उत्कृष्ट पखवाज वादक अभिलाश रसाळ श्रीपती बाबा प्रसादिक भजन मंडळ, पनवेल.
जिल्हास्तरीय निकाल – मुंबई- श्री स्वामी समर्थ भजन मंडळ भांडूप, बुवा सचिन कुडाळकर, ठाणे- स्वरश्री भजन मंडळ कल्याण, बुवा सौ. मंजिरी सावंत, मुंबई उपनगर- ग्रामदेवता प्रासादिक भजन मंडळ बुवा रूपेश पाटील, रायगड- जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ, कर्जत बुवा राजेश बोराडे, रत्नागिरी- वक्रतुंड प्रासादिक भजन मंडळ, आडिवरे, बुवा संजय तारळकर, सिंधुदुर्ग- लक्ष्मीनारायण भजन मंडळ वालावल, बुवा सूरज लोहार.
महिला सर्वोत्कृष्ट लाइक बुवा- आलिशा अविनाश वासावे, सोमजाई प्रासादिक भजन मंडळ, वरवडे, बुवा कोमल वरवटकर, ज्ञानेश्वर माऊली प्रासादिक भजन मंडळ गोठीवली, रायगड, बुवा कुमारी गीतांजली उमाटे, आदिनाथसिद्ध महापुरुष भजन मंडळ, मालवण बुवा दिव्या गोसावी, स्फूर्ती भजन मंडळ, दिवे आगर, बुवा श्रीमती अनिता बापट, परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली पुष्पांजली भजन मंडळ, बुवा कुमारी स्वरा खरगावकर.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:32 PM 04-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here