सह्याद्री ट्रेकर्सतर्फे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0

रत्नागिरी : सफर सह्याद्री ट्रेकर्सतर्फ कोकणातील पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार मोठ्या प्रमाणावर मदतनिधी जमा झाला. या मदतनिधीतून आठवडाभर पुरेल, अशी रोज वापरात लागणारी अन्नधान्याची मदत या संस्थेतर्फे करण्यात आली. वाशिष्ठी नदीच्या काठी असलेल्या मजरेकाशी, दळवटणे भुवडवाडी, बागवाडी, मिरजोळी जुवाडबेट, सती, कोंढ, कळंबस्ते या गावांतील पूरग्रस्त २०० कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवण्यात आली. सफर सह्याद्री परिवारावर विश्वास दाखवत पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात दिल्याबद्दल ट्रेकर्सतर्फे देणगीदारांचे आभार मानण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:53 PM 04-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here