T20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान भिडणार; ‘या’ दिवशी रंगणार सामना

0

क्रिकेट चाहत्यांसाठी भारत आणि पाकिस्तान सामना म्हणजे आनंदाची पर्वणी असतो. आता क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बऱ्याच कालावधीनंतर भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहे. येत्या 24 ऑक्टोबर रोजी दुबईत भारत आणि पाकिस्तान दरम्यान सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडल्यामुळं दोन देशांतील क्रिकेट सामन्यांच्या मालिका कित्येक वर्षापासून खेळल्या गेलेल्या नाहीत.

टी20 वर्ल्ड कपची सुरुवात यावर्षी 17 ऑक्टोबरपासून UAE मध्ये होणार आहे. या विश्वचषकात सर्वांचं लक्ष भारत आणि पाकिस्तानमधील सामन्याकडे लागले आहे. दोन्ही देशांमधील क्रिकेटचे चाहते या सामन्याची वाट पाहून आहेत. दोन वर्षांपूर्वी आयसीसीच्या वन डे विश्वचषकात याच दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना रंगला होता. आणि आता दोन वर्षानंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने येणार आहेत.

आयसीसीकडून टी20 विश्वचषकाची गटवारी जाहीर

आयसीसीने टी20 विश्वचषकाची गटवारी नुकतीच जाहीर केली. यात भारत आणि पाकिस्तानचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. ब गटातल्या या संघांमध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडसह पात्रता फेरीतल्या दोन संघांचा समावेश असणार आहे. तर अ गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि पात्रता फेरीतून येणारे दोन संघ असतील. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा पार पडणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:08 PM 04-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here