चौथीच्या मुलांवर देशद्रोहाचा गुन्हा!

0

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात एका शाळेत नाटक बसवल्याने पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. कर्नाटकातील बिदर येथील शाहीन ग्रुपच्या शाळेकडून हे नाटक बसवण्यात आले होते. विशेष म्हणजे या नाटकात चौथीच्या मुलांचा समावेश होता. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते निलेश रक्शल्य यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणात कोणालाही अटक केलेली नाही. मात्र, शाळेतील मुलं पोलीस ठाण्यात बसल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन संताप व्यक्त होत आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात नाटक सादर करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शाळा आणि व्यवस्थापनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळा व्यवस्थानपनाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. देशात सध्या जी परिस्थिती आहे ती दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पालक आणि विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केले असा आरोप करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here