लाखो सरकारी शाळांमध्ये प्ले स्कूल उभारणार; मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

0

नवी दिल्ली : मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सर्वांगीण शिक्षण स्कीम 2.0 लागू करणे आणि केंद्राद्वारे संचलित विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाचा कार्यकाळ आणखी दोन वर्षे वाढविण्याचा निर्णय आहे. शिक्षा योजना 2.0 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत लागू राहणार आहे. यासाठी 2.94 लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. राष्ट्रीय शिक्षण नितीनुसार सर्वांगीण शिक्षण योजना 2.0 मध्ये प्ले स्कूल आणि अंगणवाडीला औपचारिक रुप दिले जाणार आहे. सरकारी स्कूलमध्ये देखील प्ले स्कूल सुरु करण्यात येणार आहे. शिक्षकांना त्यानुसार तयार केले जाणार आहे, असे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. तर सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, फास्ट ट्रॅक कोर्टाची केंद्र सरकारच्या योजनेचा कार्यकाळ दोन वर्षांसाठी वाढविला जाणार आहे. आजच्या या बैठकीत सर्वांगीण शिक्षण योजनेची मुदत 2026 पर्यंत वाढविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 2.0 असे पुढे नाव देण्यात आले आहे. यावर जवळपास तीन लाख कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यामध्ये केंद्राचा वाटा हा 1.85 लाख कोटी असेल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
6:06 PM 04-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here