पेण तालुक्यात बीएसएनएल टेलिफोन व मोबाईल सेवेचे तीन तेरा

0

पेण तालुक्यात बीएसएनएल टेलिफोन व मोबाईल सेवेचे तीन तेरा वाजले आहेत. मागील सुमारे पंधरा दिवसापासून येथील हजारो ग्राहकांना बीएसएनएलची सेवा मिळत नसल्याने ग्राहक वर्गामध्ये संताप व्यक्त होत आहे. हजारो रुपयांचे बीएसएनएलचे रिचार्ज मारून सुद्धा ग्राहकांना सेवा मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत व त्यांची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे. यासंदर्भात बीएसएनएल अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता पेण खोपोली रोडचे सध्या रुंदीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे तेथे टाकलेली ऑप्टिकल फायबर केबल वारंवार बाधीत होत असल्याने सेवा सुरू होत नाही. त्याचे दुरुस्तीचे काम सध्या सुरू असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरण पेण ते पनवेल दरम्यान असलेली बीएसएनएलची ऑप्टिकल फायबर केबल 100% नादुरुस्त झाल्याने पेण ते खोपोली या दरम्यान असलेल्या केबल वरून पनवेल पर्यंत संपर्क साधला जात होता परंतु आत्ता या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने येथील केबल ही जागोजागी तुटून नादुरुस्त झाली आहे मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू होण्याच्या 3 वर्ष आधी म्हणजे 2006 – 07 च्या दरम्यान सदर केबल हटवून दुसरीकडे टाकण्याचे लेखी पत्र देण्यात आले होते परंतु तत्कालीन बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज पेण तालुक्यातील हजारो ग्राहकांना त्याचा भुर्दंड भोगायला लागत आहे. पेण तालुक्यात ग्राहकांना सेवा देण्याकरिता पेण येथे मुख्य कार्यालय असून या कार्यालयात एकूण 38 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत त्यापैकी 26 जणांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून 1 फेब्रुवारीपासून फक्त 12 कर्मचार्‍यांवर पेण तालुक्यातील बीएसएनएलचा कारभार चालणार आहे मागील 10 वर्षांपासून बीएसएनएल मध्ये नोकर भरती करण्यात आली नाही तसेच येथील कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2019 चा पगार देखील देण्यात आलेला नाही देखभाल दुरुस्ती करता असलेले दोन्ही वाहन कार्यान्वित नसल्याने तसेच त्याच्या डिझेल करता व मेंटेनन्स करता पैसे नसल्याने येथील कारभार ठप्प झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here