मराठी शाळांमध्ये आयटम साँगवर बंदी, रत्नागिरी झेडपी अध्यक्षांचा निर्णय

0

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या एका अनोख्या निर्णयाने सध्या रत्नागिरी जिल्हा परिषद चांगलीच चर्चेत आली आहे. शाळांमधील संस्कृती आणि महाराष्ट्राची लोककला टिकून रहावी यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये मराठी किंवा हिंदी आयटम साँगवर बंदी घालण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अडीच हजार शाळांना हा निर्णय बंधनकारक असणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने हे नवीन जिल्हा परिषद अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील सांस्कृतिक कार्यक्रम किंवा स्नेह मेळाव्यात हिंदी किंवा मराठीमधील आयटम साँगवर बंदी घातली आहे. महाराष्ट्रातील संस्कृती टिकावी आणि जिल्हा परिषद शाळांमधून मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी हा अनोखा निर्णय रोहन बने यांनी घेतला. जिल्हा परिषदेच्या अडीच हजार शाळांसाठी हा निर्णय बंधनकारक करण्यात आला आहे. शाळेच्या चालू शैक्षणिक वर्षात कुठल्या ही कार्यक्रमात हिंदी किंवा मराठीतल्या आयटम साँगवर थिरकण्यास मुलांना परवानगी नसेल. या निर्णयाचे पालक आणि शिक्षकांनी सुद्धा स्वागत केलं आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या दरवर्षीच्या सांस्कृतिक किंवा कुठल्याच कार्यक्रमात आयटम साँग आता लावता येणार नाही. या निर्णयाचे स्वागत जिल्हा परिषद शाळेतील मुलांनीही केलं आहे. आपण यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राच्या लोककला सादर केरू असं मुलांकडून सांगण्यात येत आहे. या अनोख्या निर्णयाने सध्या रत्नागिरी जिल्हा परिषदेची चर्चा आहे. जिल्हा परिषद शाळांमधला शैक्षणिक दर्जावर नेहमीच प्रश्न चिन्हं उपस्थित रहातं. पण या नियमामुळे मुलांच्या वागण्यात त्यांच्या खरंच महाराष्ट्राच्या लोककलेविषयी आदर निर्माण होईल का हा खरा प्रश्न आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here