टोकियो : नेमबाज अभिनव बिंद्रा याच्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या दुसऱ्या भारतीय खेळाडूचा मान कुस्तीपटू रवी कुमार दहियाला पटकावण्यात अपयश आलं. ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय मल्लाला रशियाच्या युगूएव्ह झाव्हूरकडून पराभव पत्करावा लागला. रवी कुमारला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताचे हे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पाचवे पदक आहे. दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला रवी कुमार दहियानं कडवी टक्कर दिली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
4:56 PM 05-Aug-21