जिल्ह्यात आज कोरोनामुळे १० जणांच्या मृत्यूची नोंद

0

रत्नागिरी : जिल्ह्यात आज नवे १७२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामध्ये आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या दोन हजार २४९ नमुन्यांपैकी दोन हजार १७० अहवाल निगेटिव्ह, तर ७९ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या दोन हजार ७१९ पैकी दोन हजार ६२६ अहवाल निगेटिव्ह, तर ९३ पॉझिटिव्ह आले. दोन्ही मिळून १७२ पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७२ हजार ४७७ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख ४१ हजार ३४० जणांची कोरोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ४८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोनामुक्तांची संख्या ६८ हजार २१० झाली आहे. कोरोनामुक्तांची टक्केवारी ९४.११ झाली आहे. आज दहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

आज दोन हजार १० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ५९६, तर लक्षणे असलेले ४१४ रुग्ण आहेत. ९०२ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ६८६, डीसीएचसीमधील १८४, तर डीसीएचमध्ये २३० रुग्ण आहेत. बाधितांपैकी १४१ जण ऑक्सिजनवर, ७१ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

यापूर्वीच्या ४ आणि आजच्या ६ अशा एकूण १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील २.३२ हा मृत्युदर वाढून तो २.९२ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या दोन हजार ११६ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३१, दापोली १८१, खेड १८५, गुहागर १५४, चिपळूण ४००, संगमेश्वर १८५, रत्नागिरी ७२७, लांजा ११३, राजापूर १४०. (एकूण २११६).

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
9:04 PM 05-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here