रत्नागिरी : माघी गणेशोत्सवनिमित्त ‘स्माईल, शाईन अँड स्पार्कल’ने लखलखला मंच….

0


रत्नागिरी – अभ्युदय मित्र मंडळ माघी गणेशोत्सवात स्माईल, शाईन, अँड स्पार्कल या फॅशन शो ने सर्वांची मन जिंकली. मुलांचं निरागस हास्य, तरुणांचा तेजस्वीपणा आणि आई मुलांच्या नात्यांचा चमचमता बंध यामुळे अभ्युदय मित्र मंडळ माघी गणेशोत्सवाचा रंगमंच लखलखला. मंडळाच्या माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने येथील सभासदांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यावर्षीही स्माईल शाईन अँड स्पार्कल हा फॅशन शो सादर करण्यात आला. आई आणि मूल ही संकल्पना घेऊन हा कार्यक्रम बसवण्यात आला होता. लहान मुलांपासून तरुण मुलं- मुली, मोठ्या वयाच्या महिला यांनी सहभाग घेतला. केशभूषा, वेशभूषा यांच्यामधील वैविध्यपूर्ण सादरीकरण उपस्थितांची वाहवा मिळवून गेले. या कार्यक्रमाची संकल्पना तसच ड्रेस डिझाईन हे मुग्धा साळवी यांचं होते. कोरिओग्राफी ईशा साळवी, तांत्रिक साहाय्य धनश्री साळवी, रंगमंच सहाय्य प्रिया साळवी आणि निवेदन सोनाली सावंत यांचे होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here