बस आणि विमान प्रवासाला परवानगी, मग लोकलला का नाही ? भाजपाचे अनेक ठिकाणी ‘रेलभरो’ आंदोलन

0

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळावी, या मागणीसाठी भाजपाकडून मुंबईतील चर्चगेट, कांदिवली, बोरिवली, घाटकोपर, ठाण्यात आंदोलन केलं. याशिवाय, अनेक ठिकाणी आंदोलन करण्यापासून भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं. दरम्यान, भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रेलभरो आंदोलन केलं. बस आणि विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात येते. मग रेल्वेतून प्रवास का करू दिला जात नाही?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. आज विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात लोकल प्रवासासाठी मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. दरेकरांसोबत यावेळी आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार राहुल नार्वेकर उपस्थित होते. आंदोलनावेळी पोलिसांनी आमदार नार्वेकर यांना ताब्यात घेतलं. तर, तिकडे कांदिवलीत आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी प्लॅटफॉर्मवर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:45 PM 06-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here