आंजर्लेत गावठी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई; दारूसह दुचाकी जप्त

0

दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथे अवैधपणे गावठी दारू विक्री करणाऱ्या एका संशयितावर दापोली पोलिसांनी कारवाई करत दहा लिटर गावठी दारूसह दुचाकी असा ३० हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. संशयित अमर शंकर वेलदुलकर (५१, रा. पाडले, तालुका दापोली) हा दि. ३ ऑगस्ट रोजी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास आंजर्ले येथील सावनेपुळण जवळील लाईट हाऊस समोर रस्त्याच्या कडेला नायलॉन पिशवीमध्ये दहा लिटर गावठी दारूसह आढळून आला. या दारूची किंमत पाचशे दहा रुपये तसेच तीस हजार रुपये किमतीची एम.एच.०८ए.आर. असा अर्धवट नंबर असलेली दुचाकी असा सुमारे ३० हजार ५१० रुपये किमतीच्या मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:39 PM 06-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here