शरद पवार यांनी घेतली कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट

0

बंगळुरू : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली. बोम्मई यांच्या विनंतीवरून त्यांची भेट घेतल्याचं ट्विट पवार यांनी केलं आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पवारांच्या भाजप नेत्याशी सुरू असलेल्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बेंगळुरूमध्ये आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेतली. पवार यांनीच ट्विट करून ही माहिती दिली. ‘मी आज बंगळुरूमध्ये होतो. त्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा मला फोन आला. त्यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचं पद पाहता मी त्यांना भेटण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्याशी माझी भेट झाली. त्यांनी माझं चांगलं आदरतिथ्य केलं. महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्य गेल्या अनेक वर्षापासून परस्पर सहकार्याने काम करत आले आहेत. त्यामुळे यापुढेही ही परंपरा कायम राहील अशी आशा आहे’, असं पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:53 PM 06-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here