रत्नागिरी: मागील दोन दिवसांपासून सुटलेल्या गारठवणाऱ्या वाऱ्यांचा मोठा परिणाम जिल्ह्याच्या मत्स्योत्पादनावर झाला आहे. दोन दिवसांपासून मासेमारी करणाऱ्या नौकांना रिपोर्टच मिळत नसल्याने मच्छीमार पूर्णतः हताश झाले आहे. बुधवारी दुपारपासून वाऱ्याचा वेग वाढला. बुधवारी समुद्रात गेलेल्या नौका रात्रीच माघारी परतल्या. गारठवणाऱ्या वाऱ्यामुळे मासळीच मिळत नसल्याचे गिलनेटसह छोटे मच्छीमार अडचणीत आले असून मत्स्यदुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. येणाऱ्या कालावधीत मासळीची आवक घटण्याची शक्यता आहे.
