मुंबईतील सीएसएमटी येथे बाॅम्ब ठेवल्याच्या निनावी फोनमुळं खळबळ

0

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर बॉम्ब ठेवण्यात आला असून, घातपाताचा निनावी फोन आल्यानंतर रेल्वे आणि स्थानिक पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. यानंतर तातडीने घटनास्थळी पोलीस, बॉम्ब स्कॉड आणि श्वान पथक दाखल झाले. CSMT परिसराची कसून तपासणी केल्यानंतर संशयास्पद वस्तू किंवा तसे काही आढळून आले नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, निनावी फोननंतर भायखळा, दादर रेल्वे स्थानकावर देखील जीआरपी आणि मुंबई पोलिसांची टीम तैनात करण्यात आली होती. या स्थानकांवर येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. शुक्रवारी रात्री 9.45 दरम्यान रेल्वे विभागाला निनावी फोन आला होता. ज्याच्यानंतर मुंबई पोलिस, जीआरपी, डॉग स्कॉड आणि बॉम्ब स्कॉडकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. मुंबई पोलिसांकडून हॉक्स कॉल करणाऱ्या इसमाचा शोध सुरु आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
10:32 AM 07-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here