शरीरसौष्ठव पटूची गळफास घेऊन आत्महत्या

0

 विरार पूर्व येथे आज सकाळी शरीरसौष्ठवपटू असलेल्या अली सलीमानी या तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. नोकरी नसल्यामुळे तो नैराश्यामध्ये होता. त्यामुळे हे त्याने हे टोकाचे पाऊल उचल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे. त्याने सलग तीन वेळा ‘वसई श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकली होती. एकदा दहिसर श्री आणि ज्युनियर महाराष्ट्र श्री स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला होता. अली सालेमानी याला व्यायामाची प्रचंड आवड होती. तो विरारमधील एका जिममध्ये ट्रेनरचेही काम करीत होता. सलग तीन वेळा वसई तालुका कला – क्रिडा महोत्सवात त्याने ‘वसई श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकली होती. अनेक तरूणांमध्ये त्याने व्यायामाची आवड निर्माण करून त्यांना तो व्यायामासाठी प्रोत्साहीत करत असल्याचे त्याचे मित्रांनी सांगितले आहे. अली सालेमानी याच्या अशा अकस्मात एक्झीटमुळे तो राहात असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here