राहुल गांधी 28 डिसेंबरला मुंबई दौऱ्यावर, शिवतीर्थावर सभा घेणार

0

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं मिशन मुंबई सुरु होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधीं च्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. यावेळी पहिल्यांदाच राहुल गांधी शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत. आतापर्यंत कायमच शिवसेना आणि मनसेनं इथे सभा घेतल्या आहेत. पण आता पक्षाचं पुर्नरुजीवन करण्यासाठी आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी काँग्रेसही शिवतीर्थावर सभा घेणार आहे. त्यामुळे आता यावर शिवसेना आणि मनसे यांची काय भूमिका असणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:28 AM 07-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here