खेड : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या कोईमतूर-जबलपूर साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेगाडीला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने या गाडीला एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे २२ डब्यांची ही गाडी १ फेब्रुवारीपासून २३ डब्यांची धावणार आहे. सायंकाळच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोईमतूर-जबलपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होऊन इच्छितवेळी घर गाठणे सुलभ होत असल्याने प्रवाशांची या गाडीला सर्वाधिक पसंती मिळत आहे.
