‘अजित पवारांनी व्यापाऱ्यांच्या मागणीसंदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा…’; पुणे व्यापारी महासंघाचा इशारा

0

पुणे : शहरातील सर्व व्यापारी शनिवार-रविवारचा लॉकडाऊन पूर्ण पाळणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्व दुकानांच्या वेळा वाढवण्याचा निर्णय रविवारी होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत जाहीर करावा. अन्यथा सोमवारपासून पुन्हा शहरातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत आम्ही सुरू ठेवणार आहे, असे स्पष्टपणे पुणे व्यापारी महासंघाने जाहीर केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. या विरोधात लक्ष्मी रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी निर्बंध झुगारुन सलग तिसऱ्या दिवशीही दुकाने उघडी ठेवली आहेत. नियम डावलून सुरू असलेल्या दुकानांचे पोलिसांनी शुक्रवारीही फोटो काढले. मात्र, व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सद्यस्थितीत आम्ही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दुकाने सुरु ठेवली आहेत. व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचे, असे प्रश्न उभे राहिले आहेत. त्यामुळे शासनाने व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन वेळ वाढवून द्यावा, असे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:52 AM 07/Aug/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here