पुणे : राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे अशा काही भागात अद्यापही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. यात पुणे जिल्हयाचा समावेश आहे. याचवेळी कोरोना निर्बंधात शिथिलता देण्यात यावी अशी मागणी करत आक्रमक भूमिका पुण्यातील व्यापारी महासंघ आणि लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील पुणे शहरात कोरोना निर्बधांमध्ये शिथिलता द्या, अशी मागणी केली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे त्यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. यात पुणे शहरात कोरोना निर्बधांमध्ये शिथिलता द्या अशी मागणी करण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:39 PM 07-Aug-21