मोठी बातमी! आता 2 नाही तर घ्यावा लागणार एकच डोस

0

मुंबई, 07 ऑगस्ट: अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीच्या आपात्कालीन वापरासाठी भारतात मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. भारतात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी वापरण्यात या लशीचा वापर महत्त्वाचा ठरेल. भारतामध्ये मंजुरी देण्यात आलेलं हे पाचवं व्हॅक्सिन आहे. संपूर्ण जगभरात व्हॅक्सिनच्या साहाय्याने कोरोनाविरोधातील ही लढाई लढली जात आहे. 130 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारतात आतापर्यंत 49.53 कोटीपेक्षा अधिकांना व्हॅक्सिन देण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. मांडविया यांनी केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘भारताच्या व्हॅक्सिन बास्केटचा विस्तार होत आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला भारतामध्ये आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. भारताकडे आता पाच EUA व्हॅक्सिन्स आहेत. यामुळे देशाच्या कोरोनाविरोधातील सामुहिक लढ्याला चालना मिळेल.’ भारतामध्ये सध्या कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन , रशियन व्हॅक्सिन स्पूटनिक व्ही, मॉडर्ना च्या साहाय्याने लसीकरणाचे अभियान सुरू आहे. दरम्यान या पाचही व्हॅक्सिन्सचा डबल डोस घ्यावा लागतो. आता जॉन्सन अँड जॉन्सननच्या सिंगल डोस व्हॅक्सिनच्या आपात्कालीन वापराला मंजुरी मिळाल्याने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here