आजपासून राणीच्या बागेत अवतरणार मुंबईचे वैभव

0

भायखळाच्या राणीच्या बागेत 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत वार्षिक उद्यान प्रदर्शन भरणार असून यात मुंबईच्या मानबिंदूंचे वैभव पाहायला मिळणार आहे. यात गेट वे ऑफ इंडिया, म्हातारीचा बूट, हिंदुस्थानातील पहिली ट्राम, कापड गिरणी आणि चिमणी, चित्रनगरीचे प्रतीक असलेला कॅमेरा यांच्या पानाफुलांपासून बनलेल्या प्रतिकृती पाहायला मिळणार आहेत. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातर्फे दरवर्षी फुलझाडे-फळझाडांचे उद्यान प्रदर्शन आयोजित केले जाते. या वर्षी ‘मुंबईचे मानबिंदू’ ही प्रदर्शनाची संकल्पना असून त्याअंतर्गत या प्रतिकृती उभारल्या गेल्या आहेत. प्रदर्शनाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. वीर जिजामाता भोसले उद्यानात मध्यवर्ती संकल्पना घेऊन उद्यान खात्यातर्फे दरवर्षी उद्यान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. प्रदर्शनात कुंडय़ांमध्ये वाढवलेली फुलझाडे-फळझाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोन्साय यांचे शेकडो प्रकार मुंबईकरांना पाहता येणार आहेत. कृष्णवडासारख्या अत्यंत दुर्मिळ देशी प्रजातीची झाडेदेखील पाहता येणार आहेत. प्रदर्शनाबरोबरच विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते, बागकामाची अवजारे, बागकामविषयक पुस्तके खरेदी दालनात ठेवली जाणार आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here