नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पुण्यातील सारस बागेच्या शेजारी जाहीर आज सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ”हिटलरने जे जर्मनीत घडवलं, तेच भारतात घडवण्याचा प्रयत्न होत आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. नागरिकत्व कायदा आणि संभाव्य राष्ट्रीय नागरिक नोंदणी संविधानावरील हल्ला आहे, असं आव्हाड म्हणाले आहेत.
