जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकांना 45 दिवसांची सुट्टी

0

जनगणनेसाठी शेवटचा पर्याय म्हणून शिक्षकांना काम दिले जाईल तसेच जनगणनेचे काम करणाऱया कर्मचारी आणि शिक्षकांना 45 दिवसांची अर्जित रजा देण्यात येईल, असे नागरिक नोंदणी जनगणना ऑपरेशन्सच्या महाराष्ट्र संचालक रश्मी झगडे यांनी स्पष्ट केले. शिक्षकांना जनगणनेच्या कामातून वगळावे या मागणीसाठी आमदार कपिल पाटील यांनी गुरुवारी झगडे यांची भेट घेतली. यावेळी गर्भवती महिला तसेच आजारपण, व्याधी, अपंगत्व असलेले व निवृत्तीकडे झुकलेले शिक्षक यांना जनगणनेच्या कामातून वगळण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. परीक्षा, पेपर तपासणी आणि ट्रेनिंगमध्ये असलेल्या शिक्षकांनाही वगळण्याबाबत विचार करण्यात येईल असे आश्वासनही झगडे यांनी कपिल पाटील यांना दिले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here