श्री स्वयंभू काशिविश्वेश्वर मंदिरात आजपासून नामसप्ताहाचे आयोजन

0

रत्नागिरी : सालाबादप्रमाणे राजिवडा येथील श्री स्वयंभू काशिविश्वेश्वर मंदिरात सोमवारपासून नामसप्ताह सोहळा साजरा होणार आहे. आठ दिवस हा सोहळा होतो. दुपारी १२.१५ वाजल्यापासून सोमवार, दि. १६ रोजी दुपारी १२.३० पर्यंत नामसप्ताह सुरू राहणार आहे. त्यानंतर दिंडी सोहळा कार्यक्रम मांडवी येथील श्री देव भैरी व श्री काशिविश्वेश्वर महादेव यांचा पालखी भेट सोहळा होणार आहे. दि. २३ ऑगस्ट व दि.३० ऑगस्टला सोमवारी श्री स्वयंभू काशिविश्वेश्वर मंदिरात श्रावणमास उत्सव भजन कार्यक्रम सुरू राहणार आहे. दि. ६ सप्टेंबर रोजी सोमवती (पिठोरी) अमावस्या असून, या दिवशी श्री लक्ष्मीसित श्री सत्यनारायण महापूजा या कार्यक्रमांनी श्रावणास उत्सवाची सांगता होणार आहे. कोरोनाविषयक नियम पाळूनच कार्यक्रम साजरे होणार असल्याने सर्व भाविकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून म्हणजे मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरचा वापर करून दर्शन घ्यावे, असे आवाहन स्वयंभू काशिविश्वेश्वर देवस्थान समितीने केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:23 AM 09-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here