मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला विशेष संग्रहालयाचा दर्जा देणार : उदय सामंत

0

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला विशेष संग्रहालयाचा दर्जा देण्याकरिता समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीच्या शिफारशीनुसार या ग्रंथालयाला विशेष दर्जा देऊन संग्रहालयातील दुर्मिळ आणि नवी ग्रंथसंपदा संवर्धन आणि वाचकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास सामंत यांनी भेट देऊन पहाणी केली. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईमधील पहिले मराठी ग्रंथ संग्रहालय शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असून मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास विशेष दर्जा देण्यासाठी योग्य तो निधी वितरित करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले. यावेळी बोलताना सामंत म्हणाले, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात 1956 पासूनचे चित्रा चे दिवाळी अंक आणि अतिशय दुर्मिळ पोथ्या व ग्रंथ या संग्रहालयात आहेत. यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी वेगळा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच ज्या ग्रंथांना लॅमिनेशनची गरज आहे त्याचे लॅमिनेशन करण्यात येईल. या संग्रहालयात मराठी संशोधन मंडळ आणि इतिहास संशोधन मंडळ कार्यरत आहे. यांच्या माध्यमातून नवीन साहित्य निर्मिती करण्यात येत आहेत, असेही सामंत यांनी सांगितले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु व मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे उपाध्यक्ष भालचंद्र मुणगेकर, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here