राजापूरच्या सभापतिपदी करुणा कदम यांची बिनविरोध निवड

0

राजापूर : राजापूर पंचायत समितीच्या सभापतिपदाची सोमवारी निवड झाली असून कोंड्ये तर्फे सौंदळ गणाच्या शिवसेनेच्या सदस्या करुणा कदम यांची बिनविरोध निवड झाली. आमदार राजन साळवी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी सौ. कदम यांचे अभिनंदन केले. आगामी पंचवार्षिक निवडणुका होईपर्यंत सौ. कदम यांच्याकडे सभापतिपद राहणार आहे. नूतन सभापती सौ. कदम यांचे पती कमलाकर कदम यांनी यापूर्वी पंचायत समितीचे सभापतिपद भूषविले असून पती-पत्नी दाम्पत्याने सभापतिपद भूषविण्याचा पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. बारा सदस्य असलेल्या राजापूर पंचायत समितीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असलेले सभापतिपद सत्ताधारी शिवसेनेत पूर्वी ठरलेल्या धोरणानुसार जास्तीत जास्त सदस्यांना संधी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार प्रमिला कानडे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सोमवारी निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली. निवड झाल्यानंतर सौ. कदम यानी लागलीच सभापतिपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी आमदार श्री. साळवी, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उपतालुका प्रमुख रामचंद्र सरवणकर, विश्वनाथ लाड, शहरप्रमुख संजय पवार, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती भारती सरवणकर, विभाग संघटक उमेश पराडकऱ, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:22 AM 10-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here