रत्नागिरी दि.31:- राज्यात सर्व अकृषि विद्यापीठांमध्ये मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करुन सर्वांना उत्तम आरोग्याचा संदेश
देण्याचा मनोदय असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयात करावी असा निर्णय झाला व त्याची प्रथम अंमलबजावणी
आज संगमेश्वर येथील नवनिर्माण महाविद्यालयाच्या मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान झाली. रन फॉर एज्युकेशन या मॅरेथॉनचे
उदय सामंत यांनी हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने, संस्थेचे प्रमुख
अभिजित हेगशेट्ये, प्रातांधिकारी विकास सूर्यवंशी, लोवले ग्रामपंचायतीचे सरपंच चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती
होती.
स्पर्धेसारख्या उपक्रमांनी सकारात्मक ऊर्जा तर मिळतेच सोबत आरोग्यवर्धनही होते यामुळेच मला ही संकल्पना
सुचल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.
