केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बजेट सादर करणार

0

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प सादर करणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थमंत्री म्हणून दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. इंदिरा गांधी यांच्यानंतर केंद्रीय अर्थमंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्या त्या दुसऱ्या महिला आहेत. 2020-21 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प त्या आज सादर करणार आहे. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाचं वाचन सुरू होणार आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर करण्यात आला असून त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी समोर आली आहे. देशाचा आर्थिक विकास दर 6 ते 6.5 टक्के राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, 2016 पर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी बजेट सादर करण्याची प्रथा होती. मात्र माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017 पासून 1 फेब्रुवारीला बजेट सुरु करण्यास सुरुवात केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्येही हीच प्रथा सुरु आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here