उद्यमनगर येथे बंगल्यात चोरी

0

रत्नागिरी : शहरातील उद्यमनगर येथे बंगल्याच्या पाठीमागील दरवाजातून प्रवेश करत रोख रक्कम आणि इतर सामान असा एकूण १४ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लांबवला. ही घटना रविवार, दि.८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा.सुमारास उघडकीस आली. याबाबत कार्तिक मल्लिकाअर्जुन जोशी (३३, रा.श्री गजानन बंगला, उद्यमनगर गोडबोले स्टॉप, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, शनिवारी मध्यरात्री १ वाजल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंगल्याच्या पाठीमागील उघड्या दरवाजातून बंगल्यात प्रवेश केला. त्यानंतर त्याने हॉल, देवघर व इरत खोल्यांमधील रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण १४ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:04 PM 10-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here