केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२०-२१ चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. आज सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर होणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. आर्थिक स्तरावर अनेक आव्हानांना सामोरं जाणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी, या अर्थसंकल्पातून काय सादर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. देशाचा आर्थिक विकासाचा दर म्हणजे जीडीपी २०२०- २१ या कालावधीत ६ ते ६.५ टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. अर्थसंकल्प २०२० संसदेत सादर होण्यापूर्वी याचा परिणाम शे्अर मार्केटवरही पाहायला मिळतो आहे. सेन्सेक्स ४० हजार ५७६ तर निफ्टी ११ हजार ९१० अंकांनी घसरला आहे.
