महाराष्ट्र लवकरच ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण असणारे देशातील पहिलं राज्य ठरणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनअभावी विविध अडचणींचा सामना करावा लागला होता. आता येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक जिल्ह्याने ऑक्सीजन बाबत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे, महाराष्ट्र हे देशातील ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणारे पहिले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मीरा भाईंदर येथील ऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे नगरसेवक आदी उपस्थित होते.

मीरा भाईंदर महानगरपालिकेने विविध लोकोपयोगी विकासात्मक कामे केलेली आहेत. यामध्ये जलतरण तलाव तसेच नाट्यगृह यांचे काम प्रगतीपथावर आहे. मीरा भाईंदर या भागांमध्ये कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आमदार प्रताप सरनाईक यांच्या कामाच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे करण्यात आली आहेत, आणि भविष्यामध्ये केली जाणार आहेत, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

कोरोना काळामध्ये सर्वात प्रथम ठाणे जिल्ह्याने ऑक्सिजन प्रकल्प उभारला होता, यामुळे ठाणे जिल्हा ऑक्सिजनबाबतीत स्वयंपूर्ण झालेला पहिला जिल्हा आहे. मागील कोरोना लाटेचा अनुभव पाहता येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोणताही रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोनामुक्त गाव ही संकल्पना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने आपले गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न केले तर महाराष्ट्र नक्कीच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोना हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाहीये; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडसावले

कोरोना काळातही आंदोलन करणाऱ्या विरोधकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कान उपटले आहेत. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर विरोधकांनी आंदोलने सुरू केली आहेत. अमूक सुरू करा, तमूक सुरू करा, असं सांगत आहेत. अरे आंदोलने कसली करताय? कोरोना हा काही सरकारमान्य कार्यक्रम नाहीये, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.

प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मीरा रोड येथे हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांट सुरू करण्यात आला आहे. या प्रसंगी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, युवासेना सचिव, नगरसेवक पूर्वेश सरनाईक आदी उपस्थित होते. या प्रकल्पाचे लोकार्पण करताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चांगलेच फटकारे लगावले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:51 PM 10-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here