चीनमधील भारतीय मायदेशी परतले

0

चीनमध्ये कोरोना व्हायरसने अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. त्यातच आता चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. 324 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान चीनमधील वुहान येथून निघून, दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. ज्यानंतर हे विमान दिल्लीत पोहचले आहे. या नागरिकांना भारतात आणल्यावर तातडीने घरी पाठवण्यात येणार नाही. या सगळ्या रुग्णांसाठी भारतीय लष्कराने हरयाणा येथील मानेसरमध्ये तात्पुरते रुग्णालय उभारले आहे. चीनमधून येणाऱ्या नागरिकांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या सगळ्यांना मानेसर येथे डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here