चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबई कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीला

0

मुंबई : चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबई आज कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीला कोकणात दाखल झाले आहे. हे मंडळ पुरात वाहून गेलेल्या संसारांना मदतीचा हात देणार आहेत. महाड, पोलादपूर व चिपळूण येथील पूरग्रस्तांना या मंडळाच्या वतीने मदत देण्यात येणार आहे. यात नांगलवाडी येथील ८ कुटुंब, महाड येथील दहीवाड १ -५३ कुटूंब व दहीवाड २,-३८ कुटुंब,खडकवाडी-२६ कुटुंब आणि वाकी-५० घरं यांच्यापर्यंत मदत पोहचवली जाणार आहे. तसेच पोलादपूर येथील बाजीरे गांव ४८ घरे, चिपळूण खेर्डी माळे वाडी वशिष्टी नदीच्या बाजूला आहे अशा एकूण २५० घरातून मदत दिली जाणार आहे. नांदगांव -देवगड रोड वरील असलदे गावातील स्वस्तिक फाऊंडेशन संचालित दिविजा आश्रम येथे सकाळी १०:३० वा. जिवनावश्यक वस्तू व आवश्यक साहित्य मदत म्हणून आश्रमाला मंडळाकडून भेट देण्याचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२ वा.पणदूर तिठा येथील संविता आश्रमाला चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाकडून ८ लोखंडी फोल्डिंग बेड व जिवनाश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत. चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबई यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:30 AM 11/Aug/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here