सर्पदंशाने वेळवी येथील वृद्धाचा मृत्यू

0

दापोली : तालुक्यातील वेळवी यादव वाडी येथील अशोक शिवराम मिरगल (वय ६५) यांचा घोणस जातीच्या सापाने चावा घेतल्याने मुंबईतील सायन हॉस्पिटल उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची खबर दापोली पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील वेळवी यादववाडी येथील अशोक शिवराम मिरगल हे ९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता जंगलात गुरे चारण्यासाठी गेले असता ११ वाजण्याच्या सुमारास त्यांना घोणस जातीच्या सापाने चावा घेतला होता. त्यांना प्रथम उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची परिस्थिती सुधारत नसल्याने त्यांना ११ जुलै रोजी त्यांना सायन हॉस्पिटल मुंबई येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, तेथे उपचारादरम्यान २८ जुलै रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. सायन ठाण्यातून शून्य क्रमांकाने ही घटना दापोली पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:44 AM 11-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here