पुणे : महाविद्यालयातील ग्रंथपाल पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी. तसेच खासगी विनाअनुदानित संस्थेमधील ग्रंथपालांना समान काम समान वेतन हे धोरण ठेवून विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्धारित केलेल्या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळावे. या मागण्यांसाठी गुरुवारी १२ ऑगस्टला राष्ट्रीय ग्रंथपाल दिनापासूनच पुणे, नागपूूर आणि कोल्हापूर येथे बेमुदत साखळी उपोषण केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ तसेच आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रीडा शिक्षक संघातर्फे हे पाऊल उचलण्यात आले आहे. अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र ज्ञानोबा भताने यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महासंघाचे विश्वस्त दिलीप भिकुले, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघाचे अध्यक्ष प्रदीप बागल, क्रीडा शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा.संदीप चोपडे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. सोपान राठोड उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:41 PM 11-Aug-21