‘अर्थसंकल्पातून मुंबई अन् महाराष्ट्राच्या पदरी निराशा; केंद्राचं कुचकामी बजेट’ – बाळासाहेब थोरात

0

केंद्र सरकारकडून देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. मात्र या बजेटमधून सगळ्यात मोठी निराशा महाराष्ट्र आणि मुंबईची झाली आहे. मुंबई आणि महाराष्ट्र सगळ्यात जास्त कर देशाला देतो पण मुंबई आणि महाराष्ट्रासाठी ठोस काही नाही अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हटले की, ह्या बजेटमध्ये नवीन काही नाही, नवी बाटलीत जुनी दारू इतकचं आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करणार आधी सांगितलेलं, पण त्यासाठी ठोस उपाययोजना नाहीत, २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर कृषी विकास दर ११ टक्के असला पाहिजे पण तो फक्त २ टक्क्याच्या आसपास आहे. त्यामुळे ही पोकळ घोषणा असून शेतकऱ्यांची फसवणूकच करणारी आहे असा आरोप त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here