रत्नागिरी : भाजपा रत्नागिरीला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी युतीचे माध्यम तून मिळावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. तशी मागणी प्रांतिक पातळीवर करण्यात आली असून, रत्नागिरीचे संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणारे ना, रवींद्र चव्हाण तसेच रत्नागिरीचे प्रभारी आ. प्रसाद लाड यांच्याजवळ याबाबत चर्चा झाली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या आठवड्यात रत्नागिरी भाजप शहर कार्यकत्र्याची निवडणूकपूर्व बैठक आयोजित करण्यासाठी शहर अध्यक्षांना सूचना दिल्या असून, या बैठकीत निवडणुकीसंदर्भाने प्रचाराची रुपरेषा ठरवणार आहोत. नगराध्यक्षपदासाठी कार्यकुशल, प्रशासकीय कार्यक्षम असे हायप्रोफाईल उमेदवार निवडणुकीत उतरवण्याची भाजपने तयारी केली आहे. रत्नागिरीतील नागरिकांना आवश्यक सर्व सेवा सुविधा पर्याप्त पध्दतीने पुरविणे आणि रत्नागिरीचा विकास दृष्टीपथात आणेल. कै. डॉ. ज. शं. केळकर यांनी नगराध्यक्ष म्हणून आपली छाप या शहरावर कायम ठेवली आहे. त्या नंतर प्रमोदशेठ रेडीज, अशोक मयेकर, महेंद्र मयेकर, यांनी आपल्या कारकिर्दीत चांगले काम केले आहे. नगराध्यक्ष पदासाठी यावेळी हायप्रोफाईल कार्यक्षम उमेदवार देऊन रत्नागिरीकरांचा कौल प्राप्त करु, असा विश्वास जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.
