जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या प्रशासकीय इमारतीलाही मिळणार लिफ्ट

0

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय दुसऱ्या नव्या इमारतीलाही आता लिफ्ट सुविधा सुरू करण्यात येणार असून, त्याचे काम सध्या सुरू झाले आहे. त्यामुळे लवकरच या इमारतीत येणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. त्याचबरोबर या इमारतीवर आणखी एक मजला उठविण्यात येत असून, अन्य कार्यालयांनाही यात जागा मिळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ए आणि बी या दोन प्रशासकीय इमारतींचे बांधकाम २०१२ साली पूर्ण होऊनही अनेक तांत्रिक अडचणींमुळे दोन्हीही इमारतींचे उद्घाटन सुमारे दीड वर्षे रखडले होते. या दोन्ही बिल्डिंगपैकी प्रत्येक मजल्यावर चार ब्लॉक आहेत. ‘ए’ बिल्डिंगमध्ये एकूण १२ ब्लॉकमध्ये १६ कार्यालये, तर ‘बी’ इमारतीत १२ ब्लॉकमध्ये १५ कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांचा कारभार एकछत्री झाला तर विविध कार्यालयांची कामे एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी होतील, त्यामुळे जनतेचा वेळ आणि पैसाही वाचेल, या उद्देशाने या दोन्ही इमारती उभारण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:59 PM 12-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here