पुणे मेट्रो प्रकल्पासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेबरोबर करार

0

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक सुमारे 4 हजार 800 कोटी रुपयांचा वित्त पुरवठा करणार आहे. त्याचा सुमारे 1 हजार 600 कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्याबाबतचा सामंजस्य करार आज पुणे मेट्रो आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक यांच्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित व बँकेचे उपाध्यक्ष ऍण्ड्रय़ू मॅकडोवेल यांनी करारावर स्वाक्षरी केली. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेची महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील गुंतवणूक विकास आशादायक आहे. पुणे मेट्रोबरोबरच नाशिक मेट्रोसाठी व पर्यावरण संवर्धनाच्या प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य करण्यासाठी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, व्यवस्थापक एस. शिवमाथंन, एस. रामनाथ, युरोपियन युनियनचे राजदूत युगो अस्तुत, मारिया शॉ बारगन, सुनीता लूकव्ह, युरोपियन बिझनेस ऍण्ड टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक पौल जेनसेन आदी उपस्थित होते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here